Friday, July 31, 2015

सचिन रमेश तेंडूलकर

खेळापेक्षा खेळाडू मोठा नसतो..पण आपल्या लाडक्या सचिन तेंडूलकर यांनी परक्या देशातून आलेल्या क्रिकेट या खेळाचे GENTLEMAN'S GAME हे नाव सिद्ध करताना खेळभावनेला मोठे केले. .एका विश्वचषकाच्या वेळी वडिलांचे छत्र हरवल्याची बातमी येऊन सुधा या महान खेळाडूने आपल्या देशासाठी मैदानात उतरणे पसंत केले. .आणि पुढील सामन्यात शतक झळकावून आभाळाकडे बघताना नकळत त्यांनी  वडिलांना श्रद्धांजली वाहिली. .कुठल्याही परीस्थित संयम बाळगणारे आणि आपल्या नम्र वागण्याने सगळ्यांना जिंकून घेणारे 'सचिन रमेश तेंडूलकर' हे सर्व क्षेत्रात आदर्श व्यक्तिमत्व आहेत. .

Saturday, July 11, 2015

शिवाजी महाराज


मोठी माणसे या छोट्या लेखन मालिकेची सुरवात करताना पहिले कोणते व्यक्तिमत्व मांडायचे या बद्दल दुमत नव्हतेच. .पहिले मनात येणार ते आपले राजे. .
रयतेच राज्य व्हावे हि तर श्रीं ची इच्छा. .राजे नेहमी म्हणायचे. . गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये अडकलेल्या मराठी मुलखातील जनतेलचे स्वराज्य आणि सुराज्य महाराजांनी स्थापन केले. .
व्हिएतनाम नावाचा एक छोटासा देश १९७२ मध्ये अमेरिके सोबतचे युद्ध जिंकला. .तिथल्या सेनाप्रमुखाने  त्यावेळी महाराजांची गनिमीकावा युद्ध नीती (GUERRILLA TECHNIQUE) वापरली होती. .त्याच्या समाधीवर आजही लिहले आहे "One of the great MAVALA of Shivaji Maharaj is resting here.". .अशा या आपल्या महान राजांना मानाचा मुजरा.